मुसळधार पावसाने धानाची पिकाची राखरांगोळी; पाण्यात तरंगू लागले धानाचे पुंजणे

समाजमाध्यमात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. पाऊस बरसला मात्र, या पावसाने बळीराजाचा डोळ्यातही पूर आणला. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे हे दुख बघून मायबाप सरकारला जाग का येत नाही ? हा खरा प्रश्न आहे. कर्जबाजारी होवून बळीराजा शेती उभी करतो. ऐनवेळी निसर्ग घात करतो.

    चंद्रपूर (Chandrapur) : सोमवारला सावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धान बांध्या पावसाने तुडूंब भरल्या. कापलेल्या धानाचे पुंजने पाण्यावर तरंगू लागले. तोंडात येणारा घास निसर्गाने हिरावला. पाण्यात तरंगणारे धान पुंजने हातात घेऊन एक बळीराजा आकांत करीत आहे. टाहो फोडीत आहे.

    बळीराजाचा आकांत असा की दगडालाही पाझर फुटावा. पाण्यावर तरंगणारे धान पुजने हातात घेऊन हा बळीराजा ढसाढस रडतो आहे. बळीराजाचे दुख बघून काळजाचे पाणी पाणी व्हावे. आकांत करणारा हा बळीराजा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.

    समाजमाध्यमात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. पाऊस बरसला मात्र, या पावसाने बळीराजाचा डोळ्यातही पूर आणला. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे हे दुख बघून मायबाप सरकारला जाग का येत नाही ? हा खरा प्रश्न आहे. कर्जबाजारी होवून बळीराजा शेती उभी करतो. ऐनवेळी निसर्ग घात करतो. यातून बळीराजा गळ्याभोवती फास आवळतो. मायबाप सरकारही बळीराजाचे दुख: जाणून घेण्याचे प्रयत्न करीत नाही. हा टाहो सरकारचा कानापर्यंत पोहचायला पुन्हा किती बळीराजांना आहूती द्यावी लागणार? असा प्रश्न आहे.