अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा फाट्याजवळ वीज अंगावर पडून एका महिलेचा, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. यासह तिवसा तालुक्यातील वरूडा येथील एका बालकावर शेतात वीज कोसळल्याने त्याचाही मृत्यू झाला.
अमरावती : जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये गुरुवारी विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला. वेगवेगळ्या घटनांमध्ये विज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन १४ वर्षीय बालकांसह एका महिलेचा देखील समावेश आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा फाट्याजवळ वीज अंगावर पडून एका महिलेचा, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथे एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. यासह तिवसा तालुक्यातील वरूडा येथील एका बालकावर शेतात वीज कोसळल्याने त्याचाही मृत्यू झाला.
आयुष राजेश इंगळकर (१४, रा. देवगाव, धामणगाव रेल्वे) आणि रोशनी नरेश मांडवे (२१, रा. अंजनगाव), श्याम निरंजन शिंदे,(१४, रा.वरुडा, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनांमध्ये १७ वर्षीय तरुणासह ३ जण देखील गंभीर जखमी झाले आहेत. यासोबतच धामणगाव येथील एक पुल वाहून गेल्यामुळे तेथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरूवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अमरावती शहरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.