मेढा येथे रंगले पावसाळी आठवण कविसंमेलन; ‘आठवण चारोळी’चे लोकार्पण

विरंगुळा महिला सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था मेढा आयोजित पावसाळी आठवण कविसंमेलन महात्मा गांधी वाचनालय मेढा येथे संपन्न झाले. मान्यवरांचा सन्मान गणेश माजगावकर यांनी केला.

    मेढा : विरंगुळा महिला सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था मेढा आयोजित पावसाळी आठवण कविसंमेलन महात्मा गांधी वाचनालय मेढा येथे संपन्न झाले. मान्यवरांचा सन्मान गणेश माजगावकर यांनी केला.

    यावेळी ‘आठवण चारोळी’ संग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या मनोगतात आठवण चारोळी संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास कवयित्री जयश्री माजगावकर यांनी व्यक्त केला. कवयित्री जयश्री यांचा सन्मान कवित्वकार इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.

    कोरोना आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण मेढा व जावली तालुक्यातील अनेक ठिकाणी मोफत सॅनिटायझरची फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.