
राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे, असे भाजपा खासदार म्हणतात. बाबरी पक्षाचा पक्ष असलेले इक्बाल अन्सारीनेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत. असे असले तरी मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनला अयोध्या दौरा प्रस्तावित आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत आणि कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा विरोध आहे. आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे, असे भाजपा खासदार म्हणतात. बाबरी पक्षाचा पक्ष असलेले इक्बाल अन्सारीनेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत. असे असले तरी मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरातून अयोध्येला कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी ११ रेल्वे गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगींची घेणार भेट
५ जून रोजी राज ठाकरेंचा पहिला कार्यक्रम यूपीची राजधानी लखनऊमध्ये आहे. राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची येथे भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते रस्त्यावरील लाऊडस्पीकर आणि धार्मिक मेळाव्यांवर बंदी आणल्याबद्दल त्यांचे औपचारिक अभिनंदन करतील. येथून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट अयोध्येला पोहोचतील. अयोध्येतील रामललाच्या दर्शनासोबतच मनसे प्रमुखांचा हनुमानगढीमध्ये बजरंगबलीची पूजा आणि हनुमान चालीसाचे पठण करण्याचाही कार्यक्रम आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्याला केसरगंजमधील भाजपा खासदारांकडून विरोध केला जात आहे. त्याचवेळी अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह राज यांच्या दौऱ्याचे समर्थन करत आहेत.