महायुतीमध्ये नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार, राज ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.

  मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आज एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याचे नेमकं कारण काय हे राज ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले.

  नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामे मार्गी लागली

  राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाची कामे मार्गी लागली. त्यामध्ये अयोध्यातील राम मंदिराचा विषय आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर तयार झाले नसते. नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आम्हला वाटतं, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. परंतु १९९२ पासून ते २०२४ पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या झाडून त्यांची प्रेत शरयू नदीमध्ये टाकून देण्यात आली. मात्र अयोध्येतील राम मंदिर तयार झाल्यानंतर त्या सर्व कारसेवकांचे आत्मे आता शांत झाले असतील.आंदोलनामध्ये अनेक कारसेवकांना मारण्यात आले.इतक्या वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सुद्धा नरेंद्र मोदी नसते तर अयोध्यातील राम मंदिर तयार झाले नसते. जसे अनेक विषय प्रलंबित आहेत तसाच हा विषय प्रलंबित राहिला असता, असे राज ठाकरे म्हणाले.

  मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा

  काही गोष्टी जेव्हा चांगल्या होताना दिसतात तेव्हा एका बाजूला खंभीर नेतृत्व असल्याने त्यांना पुन्हा संधी देणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने ठरवलं की नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रासाठीच्या आमच्या काही मागण्या आहेत, त्या नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जातीलच. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचे संवर्धन हा एका महत्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा हा एक विषय आहे.

  महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय

  नरेंद्र मोदी यांना जो महायुतीमध्ये पाठिंबा दिला त्यासाठी आज मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी आमच्या पक्षातील कोणत्या लोकांसोबत संवाद साधायचा याची यादी लवकरच तयार केली जाईल. ती यादी या तीन पक्षातील लोकांना दिली जाणार आहे. त्यामुळे आमच्या लोकांना देखील त्यांनी सन्मानाने वागवावे, ही आम्ही अपेक्षा करतो. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा प्रचार करावा, तसेच महायुतीमध्ये सभांना संबोधित करायचे की नाही हे अजून ठरवले नाही, ता बघू आमच्या आधीच बुकिंग ठरलेल्या असतात, असे राज ठाकरे म्हणाले.