
रविवारी अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर शाहरुख खान, सलमान खान यासारखे अनेक बॉलीवूड कलाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी : गणरायाचे आगमन झाल्यापासून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर मुंबईमधील अनेक मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक कलाकार आणि राजकीय मंडळी भेट देत आहेत. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाला भेट दिली त्याचबरोबर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा गणरायाचे दर्शन घेतले. रविवारी अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.
त्याचबरोबर शाहरुख खान, सलमान खान यासारखे अनेक बॉलीवूड कलाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांना श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून देत त्यांचा सन्मान केला.
यावेळी त्यांचे सहकारी देखील सोबत उपस्थित होते.