close the loud speakers on the mosques or we do it a decision has to be made or else says mns chief raj thackeray in shivtirtha padwa melava nrvb

मुलुंडमध्ये एका महिलेला अॉफिससाठी मराठी असल्याने फ्लॅट/जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळाली. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांनीसुद्धा याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता खुद्द राज साहेबांनी यावर सज्जड इशारा देत, दम भरला. ट्विट करीत असले प्रकार पुन्हा घडले तर गालावर वळ उठतील अशा कडक शब्दांत इशाराच दिला आहे.

    मुंबई/मुलुंड : मराठी असल्यामुळे मुंबईत एका महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा पाहायला मिळाली. जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी या गोष्टीचा निषेध केला. मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांना समज दिली. या महिलेनंही मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यासाठी आभार मानले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.

    काय घडलं मुलुंड वेस्टमध्ये?

    तृप्ती देवरुखकर या महिलेनं कार्यालयाच्या जागेसाठी मुलुंड वेस्टमधील शिवसदन सोसायटीमध्ये चौकशी केली. मात्र, सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रीयन सोसायटीत अलाऊड नाहीत, मराठी लोकांना आम्ही जागा देत नाही, असं सांगत अरेरावी सुरू केली. या प्रसंगाचं शूटिंग तृप्ती देवरुखकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये केलं. यानंतर तृप्ती यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ पोस्ट करून घडला प्रकार सांगितला. या घटनेची दखल घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी या सोसायटीत जाऊन संबंधित सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांना समज दिली.

    सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी त्यांची माफी मगितल्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर दुसरा व्हिडीओ पोस्ट करून मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

    “असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत”

    “मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत”, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    ….तर गालावर वळ उठतील

    “मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे”, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

    “अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे”

    दरम्यान, जिथे अन्याय होत असेल, तिथे आक्रमक होण्याचे आदेशच राज ठाकरेंनी या पोस्टमधून मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. “काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे”, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.