raj thackeray and devendra fadnavis

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान सागर बंगल्यावर भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र या भेटीचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

    राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याच्यांत एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या या भेटीत काय चर्चा झाली? याची सर्वत्र उत्सुकता आहे. आज सकाळी ८ वाजता सागर बंगल्यावर झालेल्या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. अशी माहिती समोर येत आहे. तर, गणपती दर्शनाला घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी आल्याची माहिती समोर येत आहे.