ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत; तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा : राज ठाकरेंनी ठणकवले

'एनआयए'ने छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्याविरोधात पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशाप्रकारची झणझणीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

    मुंबई – ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर, या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाही. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्ट करा, यातच हिंदुस्थानाचे हित आहे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    ‘एनआयए’ने छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्याविरोधात पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशाप्रकारची झणझणीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

     

    ‘पीएफआय’विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होतोय. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.