‘त्र्यंबकेश्वरमधील प्रथा हा गावचा विषय, इतरांनी यात पडायचं काही काम नाही’, राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

    नाशिक : त्रंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar temple) शनिवारी ( १३ मे रोजी) मुस्लीम बांधवांकडून धुप दाखवण्याची प्रथा पाळताना झालेला राडा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. यावरुन मते मतातंर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी भाष्य केल आहे. ‘शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील ही धुप दाखवण्याची प्रथा थांबवणे योग्य नाही’. त्याचबरोबर बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही. गावच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेच आहे, असं म्हण्टलंय.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरमधील घटनेचा निषेध करत ही जुनी परंपरा असून त्याबाबत गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा असं म्हण्टलं. जर संदलची प्रथा शंभर वर्षे जुनी असेल तर ती मोडीत काढू नये, किंवा बंद करु नये, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात यावा. महत्वाचे म्हणजे गावचा विषय असल्याने इतरांनी यात पडायचं काही काम नाही असंही त्यांनी म्हण्टंल.

    सोशल मीडियावर ओढले ताशेर

    यावेळी राज ठाकरे म्हणाले की, त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे, असे समजते. धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढं बिघडलं कुठे? आपला धर्म एवढा कमकुवत आहे का कोणी आल्याने काही फरक पडतो. या माध्यमातून कोणाला दंगली हव्या आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

    हा गावाचा विषय

    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गावात काही जुन्या पंरपरा पुर्वीपासून सुरू असतील तर हा सर्वस्वी गावकऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टीना सोशल मीडिया कारणीभूत असून त्यावर या गोष्टी पाहिल्या जातात. त्यातून गैरसमज पसरवले जातात. महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाही, असे सूचक विधान राज ठाकरे यांनी यावेळी केले.