Raj Thackeray to give cricketers MNS name, symbol and bat with Shivmudra

मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कची ओळख आहे आणि याच पार्काच्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. राज ठाकरे हे स्वतः क्रिकेटप्रेमी आहेत आणि हेच त्यांचे क्रिकेट प्रेम आता समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्सना खास भेट देणार आहेत(Raj Thackeray to give cricketers MNS name, symbol and bat with Shivmudra).

    मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कची ओळख आहे आणि याच पार्काच्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. राज ठाकरे हे स्वतः क्रिकेटप्रेमी आहेत आणि हेच त्यांचे क्रिकेट प्रेम आता समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर्सना खास भेट देणार आहेत(Raj Thackeray to give cricketers MNS name, symbol and bat with Shivmudra).

    दरवर्षी मनसेकडून दादर इथल्या शिवाजी पार्कवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी क्रिकेट स्पर्धांच्यावेळी राज ठाकरे यांनी क्रिकेटर्सना भेट देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राज ठाकरे ही भेट क्रिकेटर्सना देणार आहेत.

    काय आहे भेट ?

    क्रिकेट खेळायची म्हणजे बॅट हवीच आणि भेट द्यायची म्हणजे स्वतः ची जाहिरात हवीच. हीच गोष्ट ध्यानात घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मनसे जवळपास पाचशे बॅट्स क्रिकेटर्सना वाटप करणार आहे. एक बॅट तब्बल दीड हजार रुपयांची असणार आहे. या बॅटवर आतील बाजूला मनसे नाव आणि शिवमुद्रा कोरलेली असेल, तर बॅटच्या बाहेरील बाजूस मनसे पक्षाचे चिन्ह इंजिन कोरलेले असेल. याशिवाय बॅटच्या दोन्ही बाजूला साईडलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे कोरलेले असेल.

    मनसेची बॅटिंग किती चालणार ?

    महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळी सारेच पक्ष तयारीला लागले आहेत. जमेल तिथे जाहिराती करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मनसेनेदेखील हिच युक्ती वापरत युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आता तरुणांच्या हातात काम नाही तर थेट बॅट देऊन मनसेने आपला हेतू सिद्ध करू पाहत आहे. त्यामुळे मनसेची ही बॅटिंग किती चालणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.