राज ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; जोरदार स्वागतासाठी जय्यत तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी ४ वाजता ते आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तसेच, येथील जुन्या मित्रांना भेटणार आहेत.

    मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उद्या मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur Tour) जात आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी ४ वाजता ते आल्यानंतर ताराबाई पार्क (Tarabai Park) येथील शासकीय सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तसेच, येथील जुन्या मित्रांना भेटणार आहेत.

    दुसऱ्या दिवशी बुधवारी राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर शाहू महाराजांच्या स्मारकाला (Shahu Maharaj Statue) अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी सावंतवाडीकडे रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी येथे पोहोचतील. तसेच, कुडाळ येथे मुक्काम असेल. राज ठाकरे ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत‌.

    स्थानिक पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे मुद्दे, संघटनात्मक समस्या आणि जिल्ह्यातील पक्षाची स्थिती याबाबत तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे कार्यकर्ते ठाकरे यांना स्वतंत्रपणे किंवा पक्षाच्या संभाव्य नवीन मित्र भाजपसोबतच्या युतीसह निवडणुका लढवण्याची परवानगी देण्यास सांगतील. पक्षाचे कार्यकर्ते त्यांना निवडणुकीपूर्वी जाहीर सभेला संबोधित करण्याची विनंती करतील.