
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. तुम्हाला उभे राहायचे असेल तर जीवाचे रान करून काम करा. येईल त्या संकटाला सामोरे जा. विरोधक तुम्हाला हसतील. तुमचा अपमान करतील. अपमान सहन करा. मन घट्ट करा. फक्त जमिनीवर पाय रोवून उभे राहा. यश नक्कीच आपले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर : मागील दौऱ्यात राज ठाकरेंना (Raj Thackeray) माणसं सापडत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, काही जणांना इतर पक्ष वाढताना बघून त्रास होतो. जो पक्ष मोठा होतो तेव्हा विरोधक हसतात. नंतर दुर्लक्ष करतात. मग ते लढायला येतात; पण आपण जिंकतो. सर्वच पक्ष यातून गेलेले आहेत, असे राज ठाकरे यांनी एक दिवस यश (Success) नक्की मिळेल असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर (Nagpur Tour) आले आहेत. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे (Letters To Office Bearer) दिली. तुम्हाला उभे राहायचे असेल तर जीवाचे रान करून काम करा. येईल त्या संकटाला सामोरे जा. विरोधक तुम्हाला हसतील. तुमचा अपमान करतील. अपमान सहन करा. मन घट्ट करा. फक्त जमिनीवर पाय रोवून उभे राहा. यश नक्कीच आपले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
१९५२ ला जनसंघाची स्थापना झाल्यानंतर भाजपची (BJP) स्थापना झाली. तर, १९९६ ला अटलजी पंतप्रधान झाले. मात्र, भाजपला खरे यश २०१४ मध्ये यश आले. असे राज ठाकरे म्हणाले. मात्र, काम करण्याच्या सातत्यातून त्यांना यश आले, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना १९६६ ला स्थापन झाली, पण सत्ता १९९५ ला मिळाली. आपल्या आयुष्यात संघर्ष बघितले. अनेक माणसं बघितली. लोक त्रास देतील पण जमीनीत पाय रोऊन उभे रहा. यश नक्की मिळेल, असा कानमंत्र दिला.