"BJP has shown political generosity if...", Raj Thackeray's statement on Bharat Ratna Awards

भाजप सरकारने आज तीन जणांना भारतरत्न पुरस्काराची घोषमा केली. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन आज जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून, बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

  Bharat Ratna Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली. काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. या पुरस्कारांनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसंच, महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

  “माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो”, असं राज ठाकरे म्हणाले.

  भारतरत्न पुरस्कारासाठी बाळासाहेबांचे नाव पुढे

  “बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं”, असंही राज ठाकरे म्हणाले. “देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल”, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

  मायावतींनीही केली मागणी
  कांशीराम यांनाही भारतरत्न द्यावा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर व्हीपी सिंह यांच्या सरकारने भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे आदरस्थान कांशीराम यांनी केलेला संघर्ष काही कमी नव्हता. त्यांनाही भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.”