raj thackeray

राज ठाकरे यांच्या 5 दिवस विदर्भाच्या दौऱ्यात नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्याला भेट देणार आहे.

    नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. 18 ते 23 पर्यंत राज ठाकरे यांचा हा दौरा असून या दौऱ्याचा शुभारंभ राज्याच्या उपराजधानीतून करण्यात आला आहे. पक्ष बांधणीच्या उद्दाशाने हा दौरा आयोजीत केल्याचं म्हण्टलं जात आहे.

    आज सकाळी त्याचं नागपुरात आगमन झालं. आज सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर मनसे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी सोबत चर्चा करतील. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे.