राज ठाकरे यांचा ट्विटमधून कोणाला इशारा; करारा जवाब मिलेगा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत स्वतंत्र गट स्थापन करून भाजपच्या सोबतीने सत्ता स्थापन केली आहे. यावेळी, त्यांना राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष मदत झाली. तसेच, शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवरही ते टीका करत असतात. आतामुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच त्यांनी ट्विटद्वारे इशारा दिला आहे.

    मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नेहमीच चर्चेचा विषय असतात. मराठीच्या मुद्द्यासह, नोकर भरती, मराठी पाट्या यासह आता हिंदूत्व (Hindutwa), मशिदीवरील भोंगे या विषयावर त्यांनी नेहमी आवाज उठवला आहे. आता त्यांनी ट्विटमधून इशारा दिला आहे.

    एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी फारकत घेत स्वतंत्र गट स्थापन करून भाजपच्या (BJP) सोबतीने सत्ता स्थापन केली आहे. यावेळी, त्यांना राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष मदत झाली. तसेच, शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवरही ते टीका करत असतात. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election) तोंडावर आल्या आहेत. त्यातच त्यांनी ट्विटद्वारे इशारा दिला आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून इशारा दिला आहे. त्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून कोणाला हा इशारा असावा, अशी चर्चा रंगली आहे. करारा जवाब मिलेगा. 27नोव्हेंबर “सबका हिसाब होगा”!!, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.