महाविकास आघाडी सरकार हे जनताभिमुख सरकार : राजेंद्र दळवी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी शासनाने घेतलेल्या जनताभिमुख निर्णयामुळे तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यास शिवसेना खंबीर असल्याची लोकांची खात्री झाल्याने शिवसेनेची ताकत वाढत चालली असून, या पुढील काळातही जनतेने शिवसनेच्या बाबतीत असलेला विश्वास व खात्री कायम ठेवण्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख (दक्षिण) राजेंद्र दळवी यांनी केले.

    शेवगाव : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी शासनाने घेतलेल्या जनताभिमुख निर्णयामुळे तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यास शिवसेना खंबीर असल्याची लोकांची खात्री झाल्याने शिवसेनेची ताकत वाढत चालली असून, या पुढील काळातही जनतेने शिवसनेच्या बाबतीत असलेला विश्वास व खात्री कायम ठेवण्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख (दक्षिण) राजेंद्र दळवी यांनी केले.

    शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान टप्पा २ मध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सहसचिव विश्वनाथ नेरूरकर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी, जिल्हा सह संपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव शहरामध्ये जिल्हाप्रमुख दळवी यांच्या हस्ते विविध ठिकाणी पार पडलेल्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा प्रमुख दळवी बोलत होते.

    ते पुढे म्हणाले की, नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शिवसेना सक्षम पर्याय आहे. त्यामुळे आगामी शेवगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. युवा सेना तालुकाप्रमुख शीतल पुरनाळे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. शहर प्रमुख सिद्धार्थ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मोटार सायकल रेली काढण्यात आली. तालुका प्रमुख अड.अविनाश मगरे, प्रा.शिवाजीराव काटे, शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, जेष्ठ शिवसैनिक एकनाथ कुसळकर, महेश पूरनाळे, प्रशांत लबडे, राजेंद्र म्हस्के, मधुकर कराड, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.