अखेर राजेंद्र गावितांचा ‘फिरता’ पॅटर्न परतला स्वगृही, फडणवीस – बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राजेंद्र गावितांनी महायुतीच्या रॅलीला देखील पाठ फिरवली होती. तिकीट कापलं गेल्यामुळं गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

    राजेंद्र गावित करणार भाजपमध्ये प्रवेश : महायुतीत खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. परंतु राजेंद्र गावित यांच्या नावाला महायुतीत विरोध केला जात होता. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत गावित यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही तासांमध्ये भाजपच्या मुंबई पक्ष कार्यालयात हा प्रवेश होणार अशी माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हजरदेखील राहणार आहेत.

    काही दिवसांपूर्वीच राजेंद्र गावित हे नाराज असल्याचे अनेक बातम्या समोर आल्या होत्या. शिवसेनेने पालघरमधून यंदा उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज होते अशा चर्चा सुरु होत्या. त्यामुळेच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे अशा चर्चा आता सुरु आहेत. गावित यांनी त्यांची नाराजी बऱ्याच वेळा बोलून दाखवली होती. त्यावेळी ते म्हणाले की, दिल्लीसह राज्यातून सातत्यानं उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं.लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राजेंद्र गावितांनी महायुतीच्या रॅलीला देखील पाठ फिरवली होती. तिकीट कापलं गेल्यामुळं गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

    शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना साथ देत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. 2018 साली गावितांना तिकिट न मिळाल्यामुळे गावितांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ते आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर भाजप पुन्हा शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटात गेले होते आणि आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.