rajendra patil yadrawkar
rajendra patil yadrawkar

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 30 ते 35 आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. त्यामध्ये नवनवीन घडामोडी घडत आहेत. यातच मंगळवारी मातोश्रीवर असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil) यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याचे स्पष्ट होत आहे.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 30 ते 35 आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. त्यामध्ये नवनवीन घडामोडी घडत आहेत. यातच मंगळवारी मातोश्रीवर असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil) यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याचे स्पष्ट होत आहे. यड्रावकर यांच्या उपस्थितीमुळे शिरोळ तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष निवडून आले आहेत. तत्कालीन राजकीय घडामोडीत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले प्रकाश आबिटकर हे नाराज झाले होते.
    राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले. त्यादिवशी यड्रावकर हे मातोश्रीवर गेले होते. परंतु त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे शिंदे यांच्याबरोबर होते. पण आता राज्यमंत्री यड्रावकर हे गुवाहाटीमध्ये दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    एकनाथ शिंदेंना ३३ आमदारांचा पाठिंबा?

    एकनाथ शिंदे यांना जवळपास ३३ आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासोबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर एका व्हिडिओमध्ये यड्रावकर हेही शिंदे यांच्याबरोबर दिसत आहेत. शिवसेनेचे आमदार आबिटकर व सहयोगी आमदार यड्रावकर दोघांनीही शिंदेंना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत आहे.