ravindra dhangekar

  पुणे : काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे राम मंदिराच्या शीलान्यासाला अनुमती दिली होती. रामराज्य आणण्याचे वचन त्यांनी दिले होते. राम मंदिरासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

  हा सोहळा सर्व रामभक्तांचा

  आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जवळ येवून ठेपला आला आहे. श्रीराम हे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा, भक्तीचा, श्रध्देचा विषय आहेत. त्यामुळे या सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले असले तरी हा सोहळा कुणा एकाचा, एका पक्षाचा नसून तो सर्व रामभक्तांचा आहे. मंदिर उभारण्यात अनेकांनी योगदान दिले. मंदिराच्या लढ्यात कार सेवकांनी दिलेले योगदान हेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

  अनेक कारसेवकांचे यासाठी बलिदान

  अनेक कारसेवकांनी यासाठी बलिदानही दिले. बलिदान दिलेल्या हजारो कारसेवाकांची कुटुंब उध्वस्त झाली. मंदिराच्या लढ्यात प्राणांची आहुती दिली त्या कारसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष निमत्रित करुन त्यांचा यथोचित गौरव करणे हेही आवश्यक आहे, आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
  सोहळा राजकीय इव्हेंट
  धंगेकर पुढे म्हणाले, अयोध्येत होणारा हा सोहळा राजकीय इव्हेंट होतो आहे. वास्तविक, आध्यात्मिक आणि धार्मिक सोहळा म्हणून याकडे पाहिले जायला हवे होते. आता ज्या अतिमहत्वाच्या व्यक्तीना, सिने कलावंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यातील बऱ्याच व्यक्तींचा हा राम मंदिर लढ्याशी काहीही सबंध नाही.