पवार कुटुंबियांनी २३ कारखाने घशात घातले; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

तुमचा रोहित लय शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्नड साखर कारखाना घशात घालून तो अतिकष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबियांनी २३ कारखाने घशात घातले आहेत. त्यामुळे असे रोहित शेतकऱ्यांच्या घरात जन्माला यावेत.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऊसाचे दर ठरवणार हेच अणि सगळ्यात जास्त कारखाने यांच्याच ताब्यात आहेत. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लय शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्नड साखर कारखाना घशात घालून तो अतिकष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबियांनी २३ कारखाने घशात घातले आहेत. त्यामुळे असे रोहित शेतकऱ्यांच्या घरात जन्माला यावेत. एफआरपी व दिवसा विजेसाठी सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याचे परखड इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

    नांदणी (ता.शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. पुढे शेट्टी म्हणाले, दिवसा शेतीसाठी वीज मिळवी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी कोर्टात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे तर शिल्लक साखरेवर नाबार्डकडून कर्ज का देत नाही. नाबार्डने थेट कर्ज पुरवावा यासाठी जरा प्रयत्न करा. शेतकरी सुखी होईल, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.

    माजी आरोग्य व बांधकाम जि.प. सभापती सावकर मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. सरकार सक्तेवर येवून दोन वर्षे झाली तरी यांना कोळसा संपत्याले समजत नाही, झोपा काढता काय? निवडणूकीत पराभूत झालो याचे दुःख नाही, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सत्तेत असताना आम्ही पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच आमच्यामागे ईडी लागले नसल्याचे त्यांनी सांगितले.

    स्वागत तानाजी वठारे तर प्रस्ताविक सागर संभुशेटे यांनी करून नांदणीतून दोन लाखाचा निधी दिला. यावेळी अजित पोवार, सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, अजित पोवार, रामचंद्र शिंदे, प्रकाश परीट, युनुस पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बसगोंडा बिराजदार, विशाल चौगुले, सतिश मगदूम, नंदकुमार पाटील, पापालाल शेख यांच्यासह  शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.