21 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर…; ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक

ऊस दारावरून गेल्या काही दिवसांपासुन स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने माजी खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले सह जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

    हातकणंगले : ऊस दारावरून गेल्या काही दिवसांपासुन स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने माजी खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले सह जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हातकणंगले येथील मध्यवर्ती बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते. यावेळी सागली कोल्हापूर हायवे च्या दोन्ही बाजू तब्बल तासभर अडवुन धरण्यात आल्या, त्यामुळे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
    यावेळी बोलताना शेट्टी यांनी मागील गळीत हंगामातील 400 रूपये व यंदाच्या वर्षी 3500 रूपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही, असा सज्जड दम देत सरकार व साखर कारखानदार यांचा चांगलाच समाचार घेतला. ऊस उत्पादक शेतकरी हे त्यांच्या हक्काचे पैसे मागत असताना कारखान दार मात्र ढोंगी सोंग करत असल्याचे शेट्टी म्हणाले, कारखानदारांना निवेदन दिली , ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चे काढले, कारखानदारांना खरडा भाकरी दिली मात्र सरकार व कारखानदार हे आपल्याच भूमिकेवर ठाम असले तरी २१ तारखे पर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुणे बैंगलौर राष्ट्रीय महामार्ग शिरोली येथे अडवण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. तर कारखानदारांनी एकजूट केली असुन सरकारही कारखानदारांच्याचं बाजूने व पोलिस ही त्यांनाच बळ देत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
    राजू शेट्टी यांचे भाषण सुरू असताना एक दूचाकीस्वार युवक आंदोलनातून मार्ग काढत निघाला होता, यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्याला मज्जाव केला, यावेळी शेट्टी यांनी त्या युवकास संबोधून सासरवाडीला निघालायस का असा सवाल करत सासऱ्याकडे पैसे नसल्याने सासराही जावायाला आता बोलवत नसल्याचे शेट्टी म्हणाले.