
'एखाद्या पक्षाचं नाव घेऊन तुम्ही निवडून येता आणि नंतर त्या पक्षालाच विसरता. ही प्रवृत्ती वेगाने वाढत चालली आहे आणि देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. अशीही टिका त्यांनी केली.
सांगली : महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी यांनी अशी प्रतिक्रीया दिली.
भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे. भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे.हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजप कडे ईडी, सी.बी.आय. इनकम टॅक्स हे तीन कार्यकर्ते आहेत आणि यांच्या माध्यमातुनच या सगळ्या उलथा पालथी होतात. हे स्पष्ट आहे. अशी टिका त्यांनी केली.
बंडखोर आमदारांवर निशाणा साधत राजू शेट्टी म्हणाले, ‘एखाद्या पक्षाचं नाव घेऊन तुम्ही निवडून येता आणि नंतर त्या पक्षालाच विसरता. ही प्रवृत्ती वेगाने वाढत चालली आहे आणि देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. आज ना उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरही अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काळाची पावले ओळखा.’ असेही ते म्हणाले.