राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार; संघटना स्थापनेनंतर छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्याचा पाठपुरावा करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली असून राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असून सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला(Rajya Sabha elections will be fought independently; Announcement of Chhatrapati Sambhaji Raje after the establishment of the organization).

  पुणे : गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्याचा पाठपुरावा करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली असून राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असून सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला(Rajya Sabha elections will be fought independently; Announcement of Chhatrapati Sambhaji Raje after the establishment of the organization).

  राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. संभाजीराजे यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी देखील त्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी सरकारवर टीका देखील केली.

  राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित पाहिले. त्यामुळे अपक्ष म्हणून मला पाठिंबा मिळायला हवा. 29 अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठे मन दाखवायला हवे. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असे राजे म्हणाले.

  स्वराज्य संघटनेची स्थापना

  वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करीत असल्याचेही संभाजीराजे यांनी जाहीर केले.

  चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता?

  यावेळी संभाजीराजे यांना स्वराज्य संघटनेचे चिन्ह आणि झेंड्याचा रंग कोणता असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे यांनी म्हटले की, अजून चिन्ह ठरवले नाही, रंगही ठरलेला नाही. महाराष्ट्राचा दौरा करत जाऊ तसे लोकं सांगतील, की हे चिन्ह घ्या, हा रंग घ्या. पण रक्तात आणि हृदयातील केशरी पट्टा तर कोणी काढून घेऊ शकत नाही, असे संभाजीराजे म्हणाले.