रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी जाहीर, आज दाखल करणार निवडणूक अर्ज

आगामी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी चालू आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीकडून (BJP) रावेर मतदारसंघात रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी चालू आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीकडून (BJP) रावेर मतदारसंघात रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी त्यांचे निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे सगळीकडे चर्चा रंगल्या होत्या. मात्र भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा रक्षा खडसेंवर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज रक्षा खडसे निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी सासरे एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

    रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे काय म्हणाले?

    रक्षा आज आगामी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. तसेच रक्षा खडसे यांनी मागील काळात चांगले काम केले असे देखील एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे रक्षा खडसे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. जनतेने आजपर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रक्षा खडसे विजयी होतील. आपला भाजप प्रवेश अजूनही झाला नसला तरी आपण भावी काळात भाजप मधे प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे, एकनाथ खडसे यांनी सांगितले.

    रक्षा खडसे काय म्हणाल्या?

    शुभकार्य करताना ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले जातात. आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरताना सर्वांचे आशीर्वाद घेणार आहे. एकनाथ खडसे आज प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत. मात्र ते त्याचं पातळीवर काम करतील. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचे आशीर्वाद घेणार आहे. आम्ही शक्तीप्रदर्शन करण्यापेक्षा कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहोत. समोर जो कोणी उभा असेलतरीसुद्धा आम्ही निवडणूक ही विकासाच्या दृष्टीने बघत आहोत. नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील यांसारखे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.