mumbai local

पनवेलला 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला. सलग सुट्ट्यांचा विचार करून हा ब्लॉक घेतला गेला. मात्र, मालगाडी घसरल्याचे निमित्त आणि त्यामुळे कोलमडलेल्या रेल्वे वाहतुकीला पर्यायी यंत्रणा उभारण्यात अन्य व्यवस्थांना सपशेल अपयश आले.

    मुंबई : पनवेलला 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला. सलग सुट्ट्यांचा विचार करून हा ब्लॉक घेतला गेला. मात्र, मालगाडी घसरल्याचे निमित्त आणि त्यामुळे कोलमडलेल्या रेल्वे वाहतुकीला पर्यायी यंत्रणा उभारण्यात अन्य व्यवस्थांना सपशेल अपयश आले. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. शनिवारी रात्रीपासून मध्य, कोकण रेल्वेवरील प्रवाशांना फटका बसत आहे.

    रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक असेल तेव्हा रेल्वेसोबतच राज्य सरकारच्या संबंधित विभागाच्या, तेथील महापालिका-नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना, अन्य आवश्यक यंत्रणांना त्याची पूर्वकल्पना दिली जाते. बेलापूरपर्यंत जादा लोकल सोडता आल्या असत्या. पण हे सर्व नियोजन कोलमडले. त्यातून प्रवासी रखडले, लुटले गेले. आता सोमवारी दुपारपर्यंत हे काम चालणार असल्याने प्रवाशांना आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे.

    रिक्षाचालकांकडून अक्षरश: लूट

    या परिस्थितीतीचा फायदा रिक्षाचालकांकडून घेण्यात येत आहे. शेअरसाठी 20 रुपयांऐवजी तब्बल 150 रुपये घेतले गेले. दरवेळी रेल्वेच्या गोंधळात असे प्रकार घडतात. पण ते रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नसल्याने प्रवाशांची लूट होते. असे जरी असले या परिस्थितीवर रेल्वेकडून साधी दिलीगिरीही व्यक्त केली गेली नाही.