राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी ;अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असे विधान अजित पवार यांनी केले होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानानांतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच आज पुण्यात सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभेला ,मला तीन वेळा दिल्लीमध्ये पाठवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार म्हणते. आता चौथ्यांदा अर्ज दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी दाखल केला आहे. जबाबदारी वाढली आहे. माझी लढाई ही वैयक्तिक नाही, वैचारिक आहे. मी आत्तापर्यंत लोकसभेत जे बोलले ती भाषणं ऐका. मी फक्त जनतेच्या हितासाठी बोलत आले, यापुढे देखील बोलत राहीन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सध्या सगळे शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते. हे सगळ्यांना माहित आहे. चंद्रकांत पाटील सतत म्हणतात शरद पवार यांना आम्हाला संपवायचं आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. भाजपच्या पोटात होतं ते ओठात आले, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

    भाजपच्या पोटात होतं ते ओठात आले

    पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे असे विचारल्यानंतर माझी कोणासोबतच नाती बिघडत नाहीत, राजकारणामुळं माझ्या नात्यासंबंधात अंतर येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितले आहे. आधीच्या खासदारांनी काही काम केलं नाही, केंद्रातून एकही प्रोजेक्ट बारामतीमध्ये आणण्यात आला नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. कदाचित दादांनी माझा कार्यअहवाल वाचला नसावा, मी त्यांना आव्हाल पाठवेन. मेरिट वर ते मलाच मतदान करतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.