गोविंदगिरी महाराज पुन्हा चर्चेत; ज्ञानवापी मशीदबाबत केलं मोठ वक्तव्य

राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी ज्ञानवापी मशीदबाबत मोठं विधान केले आहे.

    आळंदी : राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) हे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी ज्ञानवापी मशीदबाबत (Gnanavapi Masjid) मोठं विधान केले आहे. ज्याप्रमाणे शांततेत अयोध्येत श्रीराम मंदिर (Ayodhya Shri Ram Temple) झालं त्याचप्रमाणे ज्ञानवापीबाबत पक्षकार मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. आळंदीमध्ये (alandi) माध्यमांशी संवाद साधताना काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत (Mathura Shri Krishna Temple) मत व्यक्त केले.

    माध्यमांशी संवाद साधताना गोविंदगिरी महाराज म्हणाले, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा अगदी शांततापूर्ण झाला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली याचा खूप आनंद आहे. आमचा आग्रह आहे की काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर हे देखील पूजा करण्यासाठी उपलब्ध व्हावं. यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होत आहे. इतिहास साक्षी आहे. काशी विश्वनाथचा जो मुख्य नंदी आहे, त्याचं तोंड मशीदीकडे आहे. नंदीचं तोंड हे केवळ महादेवाकडे असतं. याचा अर्थ आहे की त्याठिकाणी महादेवाचं वास्तव्य होतं. आजही काही अवशेष आहेत. हे पाहता इतर आमच्या बंधूंनी मोठं मन करून हे म्हणलं पाहिजे की काही हरकत नाही. या आणि पूजा करा. मशीद दुसरीकडे होऊ शकते. हे काम आपण शांततेत आणि बंधुत्व भावातून केले पाहिजे, असे स्पष्ट मत गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

    ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात जाऊन पूजा करण्याची परवानगी

    वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला असून ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात जाऊन पूजा करण्याची परवानगी हिंदू पक्षाला दिली. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी ज्ञानवापी मशीद परिसरातील व्यास तळघरात पूजा सुरू करण्यात आली. काशी विश्वनाथ ट्रस्टने नियुक्त केलेल्या पुजाऱ्यांकडून फक्त तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा, राग-भोग करता येणार आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.