रामनवमी सर्वांसाठी खूप विशेष आणि महत्त्वाची – खासदार श्रीकांत शिंदे

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे म्हणून ही रामनवमी प्रत्येकासाठी विशेष प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

  कल्याण : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही पहिलीच राम नवमी आहे. त्यामुळे आजची रामनवमी सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. अयोध्यात पाचशे वर्षानंतर राम मंदिर बनले, राम मंदिरात रामल्ला विराजमान झाले आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे म्हणून ही रामनवमी प्रत्येकासाठी विशेष प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या रॅलीमध्ये प्रभू श्रीराम हनुमान यांच्या वेशभूषेत तरुणांनी सहभाग घेतला होता रॅली दरम्यान संपूर्ण शहर श्रीराममय झालं होतं.

  खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून हनुमान चालीसा पठण

  कल्याण पूर्वेत रामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेचा समारोप प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी श्रीरामाची पूजा केली. यावेळी राम भक्तांसोबत श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा पठण केलं. आमची प्रचार रॅलीच होती मात्र सुलभा गायकवाड या मंदिराच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

  कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा खुलासा

  कल्याण पूर्वेतील राम नवमी निमित्त आयोजित शोभायात्रेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर देखील सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी हा पण खुलासा केला की गोरपे गावात आमचा प्रचार सुरू होता. तिथे काही स्वागतयात्रा नव्हती. आमच्या प्रचाराची मिरवणूक होती सुलभा गायकवाड या मंदिराच्या कार्यक्रमासाठी आले होत्या. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली.

  श्रीराम नवमी निमित्त कल्याण पूर्वेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत तरुणांसह महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या मिरवणुकीत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, शिवसेनेचे पदाधिकारी निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड, भाजपा मंडल अध्यक्ष संजय मोरे, प्रशांत काळे, विशाल पावशे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये प्रभू श्रीराम हनुमान यांच्या वेशभूषेत तरुणांनी सहभाग घेतला होता रॅली दरम्यान संपूर्ण शहर श्री राममय झालं होतं.