रामदास कदमांच्या प्रतिमेला मारले जोडे; ठाकरे कुटुंबावरील टीकेचा शिवसेनेकडून निषेध

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या  माजी मंत्री रामदास कदम यांचा  शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

  शिरूर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या  माजी मंत्री रामदास कदम यांचा  शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारले. तसेच या आंदोलनानंतर राज्यात  ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

  शिरूर तहसील कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनास शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शिरूर आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश  जामदार,शिवसेना शिरूर शहरप्रमुख  सुनील जाधव, शेतकरी सेनेचे  योगेश ओव्हाळ ,जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार कैलास भोसले,  माजी तालुकाप्रमुख अनिल  कोल्हे, शहर संघटक राजेंद्र शिंदे  उपतालुका प्रमुख अनिल  पवार, संतोष काळे,  तालुका महिला आघाडीचे संगीता शिंदे, सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, लाला वाघचौरे,  उपशहर प्रमुख पप्पू गव्हाणे, विभागप्रमुख निलेश गवळी, विशाल फलके, निलेश जगताप, युवासेना उप तालुकाधिकारी राहुल मोहळकर, युवासेना उपशहर अधिकारी अण्णा रेड्डी, आकाश क्षीरसागर, कुंडलिक पवार, दिनेश  जगताप,  भिमराव कुदळे,  ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे,  आबासाहेब काळे, अनिल कर्पे विभाग प्रमुख पोपट ढवळे, सुनील जठार, महेंद्र येवले, सुरज काळे, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, यश धनी, सुरेश आरेवार आदी उपस्थित होते.

  ओला दुष्काळ जाहीर करावा

  गेल्या तीन महिन्यांपासून शिरूर तालुका व राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून सतत पडणारे या पावसामुळे शेती पिके शेतीमाल, अरणातील कांदे, रोपे यांचे अतोनात नुकसान झाले आहे.  त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तरी अद्याप त्या ठिकाणीचे पंचानामे नाहीत. यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे. लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत मिळावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली .

  शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची आहे. आल्या गेल्या आणि गद्दारांची नाही. या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवणार.

  -सुनिल जाधव, (शिवसेना शहरप्रमुख, शिरूर)