रामदास आखाडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळासाहेब खेडेकरचा कारागृहात मृत्यू

उरुळी कांचन येथील हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडे यांच्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपी व हॉटेल अशोकाचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५८, रा. उरुळी कांचन ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने येरवडा जेलमध्ये बुधवारी (दि १३) पहाटे निधन झाले आहे.

    उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडे यांच्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपी व हॉटेल अशोकाचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५८, रा. उरुळी कांचन ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने येरवडा जेलमध्ये बुधवारी (दि १३) पहाटे निधन झाले आहे.

    गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर १८ जुलै २०२१ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने सपासप वार करून खुन केला. गंभीर जखमी झालेल्या आखाडेंचा २१ जुलै २०२१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

    तपासा दरम्यान पोलिसांनी अशोका हॉटेलचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकरसह १० जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता हा खून व्यवसायिक स्पर्धेतून घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
    दरम्यान, याच खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकरसह १० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदयान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १३) पहाटे जेलमध्येच खेडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.