राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याने रक्तबंबाळ झाला असाल तर असलेतर सत्तेतून बाहेर पडा;  रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला

राष्ट्रवादीने आपल्या पाठीत खंजीर खुपसला असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सांगतात. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले असतील तर त्यांनी तिथून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिला आहे(Ramdas Athavale's advice to Congress).

    राष्ट्रवादीने आपल्या पाठीत खंजीर खुपसला असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सांगतात. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले असतील तर त्यांनी तिथून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिला आहे(Ramdas Athavale’s advice to Congress).

    सांगली जिल्ह्यातील जत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची अभद्र आघाडी आहे, अशी टीका ही आठवले यांनी केली.

    म्हैसाळ सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्याचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागाला लवकर मिळावे यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आठवले यांनी दिल. जत तालुक्याच्या पूर्व भागातील 48 गावांना पाण्याची व्यवस्था झाल्यास या भागाचे चित्र बदलून जाणार आहे, शेतीबरोबरच लोकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

    पाण्याची अडचण असलेल्या भागात नदीजोड प्रकल्प शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, त्यासाठी राज्य सरकारकडे ही आपण पत्रव्यवहार करणार आहोत. केंद्राकडून सर्व प्रकारची आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.