Ramdas Athavale's advice to Raj Thackeray

उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर येण्याआधी संबंध उत्तरभारतीयांची जाहीर माफी राज ठाकरे यांनी मागावी अशी अट भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंग यांनी घातली आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घतेली आहे. राज ठाकरेंनी पहिला उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच उत्तर प्रदेशला जावे असा सल्ला आठवले यांनी दिला आहे(Ramdas Athavale's advice to Raj Thackeray).

    उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर येण्याआधी संबंध उत्तरभारतीयांची जाहीर माफी राज ठाकरे यांनी मागावी अशी अट भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंग यांनी घातली आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घतेली आहे. राज ठाकरेंनी पहिला उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच उत्तर प्रदेशला जावे असा सल्ला आठवले यांनी दिला आहे(Ramdas Athavale’s advice to Raj Thackeray).

    राज ठाकरे यांनी भगवा रंग धारण केला आहे. पण त्यांनी आता शांततेच्या मार्गाने जावे असेही आठवले म्हणाले. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशला जाण्याचा अधिकार आहे, पण त्यांचा अपमान खूप झाला आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी यांचा राज्याभिषेख करण्यास त्यावेळी महाराष्ट्रा मधील ब्राम्हणांनी विरोध केला, पण उत्तर प्रदेश मधून इकडे येऊन गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेख केला होता.

    राज ठाकरे हे उत्तर भारतीयांना विरोध करतात ते चुकीचं आहे. उत्तर प्रदेशला विरोध करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचे सारख असल्याचे आठवले म्हणाले.

    राज ठाकरे हा वादग्रस्त नेता आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा नाही असे स्पष्टीकरणही आठवले यांनी दिले.