विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंचा पराभव हा काँग्रेसच्या दलितविरोधी वृत्तीचं प्रतिक, रामदास आठवले यांची काँग्रेसवर टिका

विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव हा काँग्रेसच्या दलित विरोधी वृत्तीचा द्योतक आहे. यातून काँग्रेसचे (Congress) बेगडी दलित प्रेम उघडे पडले आहे. त्यामुळे काँग्रेसवर दलित जनता तीव्र नाराज आहे असा घणाघात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर राज्यातील राजकारण तापलं असून, सरकार धोक्यात आलं आहे. या पराभवानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान आता चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभवनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव हा काँग्रेसच्या दलित विरोधी वृत्तीचा द्योतक आहे. यातून काँग्रेसचे (Congress) बेगडी दलित प्रेम उघडे पडले आहे. त्यामुळे काँग्रेसवर दलित जनता तीव्र नाराज आहे असा घणाघात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता त्याची सल आजही आंबेडकरी जनतेच्या मनात आहे. अशी टिका आठवलेंनी काँग्रेसवर केली आहे.

    2009 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha election 2009) शिर्डी (Shirdi) मतदारसंघात माझाही पराभव काँग्रेसने केला होता. आता विधानपरिषद निवडणुकीत मागासवर्गीय नेता म्हणून चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून काँग्रेसने हंडोरे यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. काँग्रेस केवळ दलितप्रेमाच्या गप्पा मारत असते, मात्र प्रत्यक्ष मागासवर्गीय नेत्याला न्याय देण्याची वेळ येते तेंव्हा काँग्रेस मागासवर्गीयांवर नेहमी अन्याय करते. अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.