राज्यपालांना होत असलेला विरोध राजकीय: आठवले

“छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे.

    पिंपरी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यावरून यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नसून त्यांनी अशी विधाने टाळली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच राज्यपालांना होत असलेला विरोध राजकीय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

    “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे, ते राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.