समतेचे अंगिकारले तत्व म्हणून जगात भारतीय संविधानाचे वाढले महत्व – रामदास आठवले

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे भारतीय संसदीय लोकशाहीचा प्राण आहे. लोकशाही ही आम्हाला युरोप अमेरिकेने शिकवण्याची गरज नाही तर लोकशाहीचा उगम जगात अडीज हजार वर्षांपूर्वी भारतात भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्म विचारातून  झाला आहे.

  मुंबई :  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. BabaSaheb Ambedkar) आपल्या प्रकृती कडे दुर्लक्ष केले मात्र देशहितासाठी संविधान (Constitution) परिपूर्ण केले. विविध जाती धर्म भाषा प्रांत अशी विविधता देशात असताना त्यांना समतेच्या बंधुतेच्या एकतेच्या धाग्यात गुंफणारे जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिले आहे.

  गरीब श्रीमंत असो की कोणत्याही जाती धर्माचा असो संविधनाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतेचे अंगिकारले तत्व म्हणून भारतीय संविधानाचे जगात वाढले आहे महत्व असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale is the National President of the Republican Party) यांनी केले.

  संविधान दिना निमित्त वांद्रे पूर्व सिद्धार्थ कॉलनी येथे रिपाइं रोजगार आघाडी तर्फे आयोजित संविधान जागर कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइं चे रोजगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक अमित तांबे; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सौ शिलाताई गांगुर्डे; अनिलभाई गांगुर्डे, चंदू जगताप, जयंती भाई गडा; तरणजीत तलवार; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे भारतीय संसदीय लोकशाहीचा प्राण आहे. लोकशाही ही आम्हाला युरोप अमेरिकेने शिकवण्याची गरज नाही तर लोकशाहीचा उगम जगात अडीज हजार वर्षांपूर्वी भारतात भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्म विचारातून  झाला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा लोकशाहीचा मुलमंत्र भगवान बुद्धांनी जगाला शिकविला आहे असे रामदास आठवले म्हणाले.

  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  रोज १८ तास अभ्यास केला. ते बुद्धिवादी नेते ज्ञानसूर्य होते.त्यांनी अत्यंत कष्ट करून संविधान लिहिले. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये संविधानावर दिवसभर  होणाऱ्या चर्चा मध्ये सहभाग घेऊन रात्री उशिरापर्यंत ते संविधान लिहीत असत. त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने देशहितासाठी व्यापक संविधान लिहिले. त्यांनी जात धर्म प्रांत भाषा यापेक्षा देश सर्वश्रेष्ठ आहे हा विचार आम्हाला शिकविला असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

  यावेळी लोकप्रिय गायक संतोष जोंधळे यांनी सादर केलेल्या  भीमगीतांच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी भीमगीते श्रवण केली.