रामदास आठवलेंनी व्यक्त केली ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्याची इच्छा; म्हणाले…

सध्या भाजपसोबत अनेक मित्र पक्ष युतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामध्ये शिवसंग्राम, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय यांसह इतर पक्षांचा समावेश आहे. त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

मुंबई : सध्या भाजपसोबत अनेक मित्र पक्ष युतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामध्ये शिवसंग्राम, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय यांसह इतर पक्षांचा समावेश आहे. त्यात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

रामदास आठवले हे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर आहेत. नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामध्ये दोन आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर आता आठवले पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. त्यात त्यांनी म्हटले की, ‘मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र, आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करेल’.

शिर्डीत महाअधिवेशन

शिर्डीत पक्षाचं महाधिवेशन होणार असून, या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. असे असताना आता त्यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र, आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

…तर आज ही वेळ आली नसती

शिवसेनेचं चिन्ह आणि नाव देण्याचा निर्णय लोकशाहीनुसार झाला आहे. निवडणूक आयोगानं बहुमताच्या बाजूनं निर्णय दिला. उद्धव ठाकरेंनी अगोदरच भाजपसोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होते. भाजपसोबत सरकार स्थापन केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा टोलाही लगावला.