रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी अभिष्टचिंतन केले आहे.

    मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हरियाणा चे मुख्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, माजी मंत्री सुरेश प्रभू, हर्ष वर्धन, खासदार बीपलव कुमार, खासदार रामदास तडस, अशोक नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चांद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार मनोज कोटक, आमदार गणपत गायकवाड, यांच्यासह देशभरातील  अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतन केले.

    संघर्षनायक म्हणून रामदास आठवले यांचा वाढदिवस दरवर्षी दि. 25 डिसेंबर ला रिपाइं तर्फे  संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार आज देशभर रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून रिपाइं तर्फे देशभर साजरा करण्यात आला.

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत पवई येथे बाळ गरुड, भाऊ पंडागळे आणि रिपाइं तर्फे भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपाइं दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वात चेंबूर कॉलनी येथे रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर मुंबई येथे रिपाइं चे  उत्तर भारतीय आघाडी चे रमेश गौड, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, गुजरात निरीक्षक जतीन भुटटा, मुलुंड येथे योगेश शिलवंत विनोद जाधव, अजित रणदिवे आदींच्या पुढाकारात रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथे रिपाइं तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड चे रिपाइं शहर अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी दिली.

    पुणे येथे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, रिपाइं महाराष्ट्र संघटन सचिव परशुराम वाडेकर, मनमाड येथे अहिरे, आदींनी मोठया उत्साहात रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला.