ramdas kadam and uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या दावणीला बांधल्याचंही रामदास कदम म्हणाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी ही टीका केली आहे.

    मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली असा आरोप शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या दावणीला बांधल्याचंही रामदास कदम म्हणाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी ही टीका केली आहे.

    महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात माझा मुलगा योगेश कदम आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी पुरवला. आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट अनिल परब यांनी रचला होता. शिवसेनेच्या फुटीला अनिल परब जबाबदार असून त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी, असेही रामदार कदम यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांची जागा जेलमध्येच असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन शिवसेना आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.

    अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा
    अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा आहे. शिवसेना पक्षामध्ये फुट पडण्याला कारणीभूत ठरणारे अनिल परब यांची जागा जेलमध्येच आहे, असं वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे.  दरम्यान, शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासूनच सातत्यानं रामदास कदमांकडून ठाकरे आणि ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर टीकेची तोफ डागली जात आहे.

    दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. तर, चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.