रश्मी ठाकरेंबद्दल बोललो ते शब्द मागे घेतो: रामदास कदम

    मुंबई – मी आंदोलनाला घाबरत नाही. मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. मी जो बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. जे वास्तव आहे ते मी बोलतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनावर दिली. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांची भुमिका घ्यावी, या अर्थाने माझे बोलणे होते, असे ते म्हणाले.

    पुढे ते म्हणाले की, मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं, रश्मी ठाकरे यांच्याविषयी रश्मी ठाकरेंबद्दल बोललो ते शब्द मागे घेतो. पण दिलगिरी व्यक्त करणार नाही, असे शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी म्हटले. माझे तोंड बंद केले. बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषण कमी केली गेली. मीडियापासून मला बाजूला केले. माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय गुन्हा केला, आमचा दोष काय, असा सवाल रामदास कदम यांनी केली. तसेच माझ्या मुलावर अन्याय झाल्याने माझी खदखद आहे आणि ती कायम राहणार आहे, असेही ते म्हणाले.

    सुषमा अंधारे कोण आहेत, हे मला माहित नाही. मला मराठवाड्यात फिरु देणार नाही, या सुषमा अंधारे यांच्या अशा आव्हांनाना किंवा बोलण्याला मी भिक घालत नाही, असे रामदास कदम म्हणाले.