मातोश्रीपासून दूर असलेले रामदास कदम कमबॅक करणार ? शिवसेनेकडून पुन्हा मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून मातोश्रीपासून दूर असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय उलथापालथीच्या परिस्थितीत शिवसेनेचे फायरबँड नेते रामदास कदम यांच्यावर पक्ष पुन्हा जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे(Ramdas Kadam will make a comeback).

    खेड : गेल्या अनेक दिवसांपासून मातोश्रीपासून दूर असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय उलथापालथीच्या परिस्थितीत शिवसेनेचे फायरबँड नेते रामदास कदम यांच्यावर पक्ष पुन्हा जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे(Ramdas Kadam will make a comeback).

    शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा विधान परिषदेत कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून गेल्या काही महिन्यांपासून दूर होते. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या सोबत झालेल्या संघर्षामुळे कदम हे मातोश्रीपासून दुरावले असल्याची चर्चा होती. मात्र, आपणभगव्याशी एकनिष्ठ असून, बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक असल्याचे कदम यांनी ठामपणे सांगितले.

    १२ रोजी कदम यांनी लिहिलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना ज्येष्ठ नेते खा.गजानन कीर्तिकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम तुम्हाला प्रवाहात राहायचंय, सेकंड इनिंगची सुरुवात जोरदार करा, असे सांगत बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरबँड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. सेकंड इनिंग जोरदार सुरु करा, असे जाहीर आवाहन केले. त्यामुळे रामदास कदम यांना शिवसेनेमार्फत कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

    मुंबईत १४ तारखेला होणाऱ्या सभेसाठी रामदास कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र रामदास कदम यांनी मात्र आपण गावातील धार्मिक कार्यक्रमाचे कारण देत या सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, कार्यक्रम उरकल्यावर आपण मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ असे जाहीर केले आहे.