रामदास कदम यांच्या वक्तव्याचा बारामतीत शिवसेनेकडून तीव्र निषेध

राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला .

    बारामती: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने
    बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला .

    कदम यांच्या प्रतिकात्मिक चित्राला जोडे मारून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. जोडे मारून आंदोलन करताना पोलिसांनी शिवसैनिकाच्या ताब्यातून फ्लेक्स ताब्यात घेतला. शिंदे गटातील रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या आरोपाचा आरोपाचा बारामती तालुका शिवसेना शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, शहर प्रमुख पप्पू माने, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, निलेश मदने, राजेंद्र पिंगळे, बाळासाहेब गावडे, सुभाष वाघ, तालुकाप्रमुख उमेश दुबे, बंटी गायकवाड, संदीप तावरे, नितीन गायकवाड, कल्याण जाधव ,कल्पनाताई काटकर, निखिल देवकाते, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश करंजे व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.