रामदेव बाबाची जीभ घसरली; म्हणाले “स्त्रियांनी काही नाही घातलं तरी चांगल्या दिसता”

साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. रामदेव बाबांच्या या विधानामुळे वाद अधिक चिघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांसंदर्भात करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनी देखील एका कार्यक्रमात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांची प्रकरणं ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

    ठाण्यातील एका योगा कार्यक्रमात आलेल्या रामदेवबाबा यांची महिलांबद्दल बोलताना जीभ घसरली. ते म्हणाले, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. हे वक्तव्य करीत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. रामदेव बाबांच्या या विधानामुळे वाद अधिक चिघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    नेमकं काय घडलं?

    महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

    महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे, शिंदे-फडणवीस एकात्म भावनेने नवनिर्माण करत आहेत. या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, रचणार आहेत. मी जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हाही एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा पुरुषार्थ आहे त्यांच्यात, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा” असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.