स्वतःच्या स्वार्थापोटी घरोबा निर्माण केला सत्तेसाठी हक्काचं घर सोडलं, राजकारणात सत्तेसाठी काहीही करणारी माणसं – रमेश कदम

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील आठ वर्ष जेलमध्ये असणारे माजी आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने मागील महिन्यात जामीन मंजूर केला आहे.

    सोलापूर – मी जेलमधून बाहेर आल्यापासून अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे मला फोन आले आहेत, बोलावणे आले आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मदत करू, परंतु मी सर्वांना हेच सांगितले आहे की, मतदारसंघातील जनतेशी चर्चा करूनच मी निर्णय जाहीर करणार आणि पुन्हा एक वेळ मोहोळ विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढणार आहे, असा निर्धार माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केला.

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील आठ वर्ष जेलमध्ये असणारे माजी आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने मागील महिन्यात जामीन मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये रमेश कदम यांनी महिबुब सुबहानी दर्गा नागनाथ मंदिर, श्रीराम मंदिर, शक्ती देवी मंदिर, साईबाबा मंदिर आणि बुद्ध नगर येथील चैत्य स्मारक आदी ठिकाणी दर्शन घेतले. त्यानंतर मोहोळ नगरपरिषदेसमोर झालेल्या सभेत ते बोलत होते.

    यावेळी रमेश कदम यांनी सांगितले मी बाहेर आल्यानंतर मी परत येणार नाही, अशी अफवा पसरविली जात आहे. परंतु, मला उच्च न्यायालयाने कायमचा जामीन दिला आहे. त्यामुळे मी आता पुन्हा मतदारसंघात कायमस्वरूपी येणार असून, महिन्यातील पंधरा दिवस मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी वेळ देणार आहे, असेही ते म्हणाले.

    याचदरम्यान, मागील चार महिन्यांच्या कालखंडात राज्याच्या राजकारणात अनेक बदल घडले अनेक पक्षातील मोठ-मोठी मंडळी स्वतःचे घर सोडून दुसऱ्यांच्या घरात गेली. स्वतःच्या स्वार्थापोटी घरोबा निर्माण केला सत्तेसाठी हक्काचं घर सोडलं, नवीन संसार सुरु केला. राजकारणात सत्तेसाठी काहीही करणारी माणसं आपण पाहतो. मात्र, आठ वर्षांपूर्वी आठ महिन्याच्या कामातून प्रेम मिळाले. महिन्यातून पंधरा दिवस मतदारसंघात राहणार आहे, असेही रमेश कदम म्हणाले.