राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, सत्र न्यायालयाने बजावले जामीनपात्र वॉरंट

न्यायालयाने (Court) हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही अनुपस्थित राहिल्यामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट बजावले आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी पुकारले होते.

    मुंबई – माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यावरून वादात अडकलेल्या अमरावतीच्या (Amravati) राणा दाम्पत्यांच्या (Rana Family) अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने (Court) हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही अनुपस्थित राहिल्यामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट बजावले आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी पुकारले होते.

    दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केला होता. मागील सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, खटल्यास दांपत्य वारंवार अनुपस्थित राहिल्याने गुरुवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधिश राहुल रोकडे यांनी दांपत्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे जामीनपात्र वॉरंट असल्याने पुढील सुनावणीस हजर राहून ५ हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार आहे.

    काय आहे प्रकरण?

    राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान आणि करोडो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाचं आंदोलन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी पुकारलं होतं. त्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दांपत्याला कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम १९२ अंतर्गत नोटीस बजावली होती.

    मात्र तरीही याबद्दल प्रसार माध्यमांसमोर प्रक्षोभक वक्तव्य राणा दांपत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम १५३ अ, ३४,३७ सह मुंबई पोलीस कायदा १२६अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यातच नंतर आयपीसी कलम १२४अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही वाढवण्यात आला. राणा दांपत्याला खार पोलीसांनी अटक करण्यात आली होती. त्यानंतर राणा दांपत्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर १२ दिवसांनी मुंबई सत्र न्यायालयाने दांपत्याला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.