Rana-Somaiya's master plan against Thackeray government

न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारचे गाल सुजले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रशासन आणि पोलिसांचा गैरवापर करत आहेत. मात्र, माफियांना आम्ही त्याची जागा दाखवून देऊ, राजद्रोह प्रकरणावरुन ठाकरे सरकारला चपराक बसली, असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सोमय्या यांनी गुरुवारी राणा दाम्पत्याची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते(Rana-Somaiya's master plan against Thackeray government).

    मुंबई : न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारचे गाल सुजले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रशासन आणि पोलिसांचा गैरवापर करत आहेत. मात्र, माफियांना आम्ही त्याची जागा दाखवून देऊ, राजद्रोह प्रकरणावरुन ठाकरे सरकारला चपराक बसली, असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सोमय्या यांनी गुरुवारी राणा दाम्पत्याची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते(Rana-Somaiya’s master plan against Thackeray government).

    महिला खासदारांना 20 फुट खोल खड्ड्यात टाकण्याची भाषा हे सरकार करत आहे. त्याप्रकरणी मी स्वत: लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असून, माफिया सरकारविषयी त्यांना माहिती देणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

    दरम्यान, बुधवारी केंद्रीय गृहसचिव यांना देखील आपण भेटलो असून, त्यांना देखील राज्यातील माफिया सरकारविषयी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचे अंत करुनच आम्ही शांत बसणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

    मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचाही माफिया पोलिस कमिशनर म्हणून सोमय्या यांनी उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, माफिया पोलिस कमिशनर कुठे आहे, राजद्रोहाची कलम सुप्रीम कोर्टाने निरस्त केली असून, आता सुप्रीम कोर्टाकडून स्पष्टीकरण मागा, संजय पांडे सारख्या माफियागिरी करणाऱ्यांचा देखील आम्ही लवकरच अंत करू, असे आव्हान देखील सोमय्यांनी दिले आहे.