रावसाहेब दानवे यांनी पुन्हा घेतली खोतकरांची भेट; निवासस्थानी जाऊन केली चर्चा…

रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा भेट घेतली. मागच्या अनेक दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या प्रचारापासून दूर होते. त्यामुळं आज दुसऱ्यांदा दानवेंनी खोतकरांची भेट घेतली.

    जालना : रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा भेट घेतली. मागच्या अनेक दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या प्रचारापासून दूर होते. त्यामुळं आज दुसऱ्यांदा दानवेंनी खोतकरांची भेट घेतली. खोतकर आणि दानवे यांच्यात ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अंतर दिसून येत होते.

    दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी खोतकर यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी आपण वरिष्ठांशी चर्चा करून प्रचारासाठी दोन दिवसात निर्णय घेऊ, असा शब्द खोतकर यांनी दिला होता. त्यावरून आज पुन्हा दानवे यांनी खोतकर यांची भेट घेतली.

    गोलापांगरी याठिकाणी दोघांचीही प्रचारसभा झाली. या निमित्ताने दानवेंनी थेट खोतकर यांचे निवासस्थान गाठले. चर्चेनंतर एकाच गाडीतून सभेसाठी रवाना झाल्याने खरोखरच मनोमिलन झाल्याचे दिसून आले.