रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, साताऱ्यात दानवेंच्या पुतळ्याचे दहन

रावसाहेब दानवे म्हणाले, ''मला असे वाटते की, हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर केले याची एकदा चौकशी व्हावी. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकते की, नाही हे तपासण्याची गरज आहे. मी सुद्धा शिवरायांचा प्रेमी आहे.

    मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्याचा एक व्हिडीओही समोर आला असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख त्यांच्याकडून झाला आहे. हा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

    रावसाहेब दानवे म्हणाले, ”मला असे वाटते की, हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर केले याची एकदा चौकशी व्हावी. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकते की, नाही हे तपासण्याची गरज आहे. मी सुद्धा शिवरायांचा प्रेमी आहे. शिवरायांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य कुणी करू नये. शिवरायांचा अवमान करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे का? याचा सर्व समाजाने विचार करायला हवा. (या वाक्यात दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.)

    रावसाहेब दानवे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका दानवे सांगत होते त्यावेळी त्यांच्याकडून एकेरी उल्लेख झाला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.