बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या, स्वारेगट पोलिसांची कारवाई; उस्मानबादमधून अटक

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून तिला गोड बोलून भेटण्यास बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या स्वारगेट पोलिसांनी उस्मानाबादमधून मुसक्या आवळल्या आहेत.

    पुणे : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून तिला गोड बोलून भेटण्यास बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या स्वारगेट पोलिसांनी उस्मानाबादमधून मुसक्या आवळल्या आहेत. त्याने तरुणाच्या न कळत तिचे अश्लील फोटो काढून ते तिच्या नातेवाईकांना पाठविले होते. संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे (वय १९, रा. चिंचोली सोन अवासा. जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे.

    संजय व पिडीत तरुणीचे इन्स्टाग्रामवर खाते होते. त्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. त्यानंतर संजयने पिडीत मुलीला गोड बोलून भेटण्यास बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचर केले. अत्याचारावेळी न कळत तरुणाचे अश्लील फोटो काढले. हे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून व पिडीत मुलीच्या काकांना पाठवून बदनामी केली होती. या प्रकरणी संजय याच्यावर स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पसार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता.

    यादरम्यान, पोलीस अंमलदार फिरोज शेख व शिवा गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संजय हा उस्मानाबाद जिल्ह्यातील सुरडी गावात असल्याचे समजले. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर व तपास पथकातील उपनिरीक्षक अशोक येवले, फिरोज शेख व त्यांच्या पथकाने त्याला सुरडी गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी संजयकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.