कल्याणमध्ये भाजप माजी नगरसेवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले.

    कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजप माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत राहत्या घरी शारीरीक संबंध ठेवले. ती चार वेळा गरोदर राहिली. चारही वेळा तिचा गर्भपात केला. तिने लग्न करण्यासाठी त्याचाकडे तगादा लावला असता तिला मारझोड केली. मारझोड करुन लग्न करण्यास नकार दिला. याची वाच्यता कुठेही करु नये यासाठी धमकी दिली. पिडीत महिले या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पिडीत महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राय यांच्या विरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मनोज राय यांचे म्हणणे आहे की, हा सर्व ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. पोलीस तपासात सर्व स्पष्ट होईल. माझ्यावर लावण्यात आलेेल आरोप खोटे आहे. तपास करताना पोलिसांना मी पूर्ण सहकार्य करणार आहे.